Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

संत गजानन फार्मसीत अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना शुभेच्छा



गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागाव ( ता.गडहिंग्लज )येथील संत गजानन महाराज कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयातील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचा शुभेच्छा कार्यक्रम उत्साहात झाला. प्रमुख पाहुणे म्हणून देवेन बाबरे यांची उपस्थित होते. अध्यक्षस्थानी डॉ. यशवंत चव्हाण  होते.



यावेळी विश्वस्त डॉ. संजय चव्हाण यांनी मनोगतातून गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक केले, तसेच संस्थेच्या गुणवत्तापुर्ण धोरणाविषयी माहिती दिली. मागील वर्षभरामध्ये विविध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विविध शासकीय पदावर काम करत असलेले माजी विद्यार्थी प्रियांका पाटील, अश्विनी पाटील, पंकज कांबळे, सोजल टोणपी, आनंद चौगले यानी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दरम्यान  सर्वोत्तम विद्यार्थी म्हणून अनघा देशपांडे, सर्वोत्तम उपस्थिती मिसबा सय्यद, शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी मयुरी सुतार, एम फॉर्म मधून सर्वोत्तम विद्यार्थी ऋषिकेश कुंभार,  शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी साक्षी गुरव या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.




कार्यक्रमासाठी ॲड. बाळासाहेब चव्हाण, बाबुराव गुरबे,प्राचार्य डॉ. अन्सार पटेल, डॉ.अजिंक्य चव्हाण, प्रा.रोहिणी पाटील, डॉ. अभिनंदन अलमान, प्रा. संतोष गुरव, प्रा. स्वप्निल हराळे यांच्यासह विद्यार्थी, पालक व शिक्षक उपस्थित होते. प्रा.रोहिणी ताटे यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.