गडहिंग्लज (प्रतिनिधी): निलजी (ता गडहिंग्लज) येथील इराप्पा गौडाडी यांच्यावरील शस्त्रक्रिया उपचारासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाकडून एक लाख रुपयांची मदत मिळाली आहे. मंजूर पत्राची प्रत संबंधित कुटुंबीयांना देण्यात आले.
महिन्याभरापूर्वी गौडाडी यांना गंभीर दुखापत झाली होता. त्यासाठी शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते, मात्र घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. शस्त्रक्रियेचा खर्च लाखाच्या घरात असल्याने येथील ग्रामपंचायत सदस्य अजय मजगी यांनी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अनिरुद्ध रेडेकर यांच्या पुढाकारातून पाठपुरावा करून मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून एक लाख रुपयाची मदत मिळवून दिली. याबद्दल गौडाडी कुटुंबांनी कृतज्ञता व्यक्त केली. याकामी वैद्यकीय मदत कक्षाचे मंगेश चिवटे यांचे विशेष सहकार्य लाभले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य बाळगोंडा पाटील, अजय मजगी, जयप्रकाश मजगी, आप्पासाहेब हुली, संतोष कोळी, बाहुबली अम्माणावर, भारतेश अम्माणावर, शिवराज वाळकी, हेब्बाळचे उपसरपंच सुरज गवळी यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

