Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हलकर्णीच्या अर्चना टोणपी यांना 'राष्ट्रीय आदर्श शैक्षणिक सेवा पुरस्कार' प्रदान

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाच्या उपक्रमांची घेतली दखल 


गोवा येथे पार पडला कार्यक्रम 



मान्यवरांच्या हस्ते गोवा येथे पुरस्कार स्वीकारताना सौ. अर्चना टोणपी, आप्पासाहेब टोणपी यांच्यासह इतर. 



गडहिंग्लज (प्रतिनिधी): हलकर्णी येथील महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या सचिव सौ.अर्चना आप्पासाहेब टोणपी यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेत 'नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन' बेळगाव व सोशल वेल्फेअर सोसायटी बेळगाव यांच्या वतीने त्यांना 'राष्ट्रीय आदर्श शैक्षणिक सेवा पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले. जिल्हा कमांडर होमगार्ड विभाग अरविंद घट्टी, राजू शिंगाडे, अमरसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत गोवा येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.



ग्रामीण भागात शिक्षण संस्थेची स्थापना करून अध्यक्ष आप्पासाहेब टोणपी व सचिव अर्चना टोणपी यांनी शिक्षणाचा प्रसार केला आहे. महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बी. एम. टोणपी मराठी विद्यालयाची स्थापना सन 2003-04 मध्ये करण्यात आली. शाळा सुरू झाल्यानंतर सन 2005 -06 साली इयत्ता पहिलीसाठी  एकूण 39 इतकी विद्यार्थी संख्या होती. आता इयत्ता पहिली ते सातवी या वर्गासाठी एकूण 148 विद्यार्थी संख्या आहे. सन 2019-20 मध्ये या शाळेला 20 टक्के अनुदान सुरू झाले. त्यानंतर 2023-24 मध्ये शाळा 40 टक्के अनुदानित झाली. या शाळेमधील शिक्षक हे विद्यार्थ्यांना उत्कृष्टरित्या मार्गदर्शन करून त्यांना घडविण्याचा प्रयत्न करतात. या ठिकाणी एकूण आठ शिक्षक ज्ञानदानाचे कार्य करतात. विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, मोफत वाहतूक व्यवस्था, सेमी इंग्रजी, सुसज्ज इमारत, पोषण आहार, मागास गरीब विद्यार्थ्यांना मोफत गणवेश आदी सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जातात. या शाळेच्या माध्यमातून सुरू असलेल्या या उपक्रमाची दखल घेत आदर्श शैक्षणिक सेवा पुरस्काराने सौ. अर्चना टोणपी यांचा गौरव करण्यात आला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.