गडहिंग्लज (प्रतिनिधी): हसुरचंपू येथील शिवसेना शाखा कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ शिवसैनिक बाळासाहेब खिचडे व रावसाहेब शेंडगे याच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला सदाशिव नांगनुरे, चंद्रशेखर खवणे, शकील मुल्ला, विजय पवार, बिराप्पा हुकेरी, भैरू बिरांजे, संभाजी येरुडकर, लक्ष्मण कमते, शिवानंद खापरे, पार्थ मुसाई, सदाशिव कुंभार, कोचरगे, बापू शेंडगे, सागर नागनुरे, मारुती फुटाणे, नितीन बीरजे, मलाप्पा मस्ती व सर्व शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते. शाखाप्रमुख राजू गोटूरे यांनी सर्वांचे आभार मानले.



