गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लजमध्ये प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी हर्षवर्धन बी जी यांनी 1 मे पासून हेल्मेट सक्ती केली होती. निवडणूक झाल्यानंतर हेल्मेट सक्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांचा विरोध आणि गैरसोय लक्षात घेता प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी हर्षवर्धन बी जे यांनी आपला निर्णय मागे घेतलेला आहे. गडहिंग्लज शहर वगळता शहराच्या बाहेर राष्ट्रीय महामार्गावर हेल्मेट न घालणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई केली जाणार आहे .
प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी हर्षवर्धन बी जे यांनी वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आणि संकेश्वर बांदा या मार्गावर अपघात होऊन काही लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. यासाठी गडहिंग्लज शहरात त्यांनी हेल्मेट सक्ती लागू केली होती. या निर्णयामुळे गडहिंग्लजकरांच्या मनात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या सूचनेनुसार 7 मे पर्यंत ही कारवाई थांबवण्यात आली होती. काल पुन्हा निवडणूक झाल्यानंतर गडहिंग्लज शहरांमध्ये हेल्मेट न घालणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात कारवाई करण्यात आली. मात्र नागरिकांची गैरसोय आणि विरोध लक्षात घेऊन प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी हर्षवर्धन बी जे यांनी गडहिंग्लज शहरातील हेल्मेट सक्ती मागे घेऊन गडहिंग्लज शहराबाहेर संकेश्वर -बांदा या राष्ट्रीय महामार्गावर हेल्मेट सक्ती केली आहे. गडहिंग्लज शहराबाहेर संकेश्वर बांदा या महामार्गावर हेल्मेट न घालणाऱ्या व्यक्तींच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा दिलेला आहे. या निर्णयामुळे गडहिंग्लजकरांना शहरांमध्ये हेल्मेट सांभाळताना जी कसरत करावी लागत होती ती आता करावी लागणार नाही. या निर्णयामुळे नागरिकांच्यातून समाधान व्यक्त केले जात आहे.

