Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तेरणी येथे बसवेश्वर जयंती निमित्त विविध कार्यक्रम, भव्य मिरवणूक



गडहिंग्लज (प्रतिनिधी): महात्मा श्री बसवेश्वर जयंतीनिमित्त तेरणी (ता. गडहिंग्लज) येथे भव्य मिरवणूक काढण्यात आली. विविध कार्यक्रमही मोठ्या उत्साहात पार पडले.




यानिमित्त भजन, बसवेश्वर जन्मोत्सव, अभिषेक, मिरवणूक व महाप्रसाद वाटप करण्यात आले. सजवलेल्या ट्रॅक्टरमध्ये महात्मा श्री बसवेश्वर यांच्या भव्य प्रतिमेचे पूजन करण्यात आले होते. मिरवणुकीच्या अग्रभागी पालखी  होती. ही पालखी देखील आकर्षकरित्या फुलांनी सजविण्यात आली होती. या मिरवणुकीसाठी ग्रामस्थांनी आपल्या बैलजोड्या  सजवून मिरवणुकीत सहभागी झाले होते. ह्या बैलजोड्या मिरवणुकीचे आकर्षण ठरले. वाद्याच्या गजरात ही मिरवणूक पार पडली. यावेळी बहुसंख्य समाज बांधव, ग्रामस्थ उपस्थित होते.


 मिरवणुकीचा व्हिडिओ येथे पहा 👇




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.