Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

चौथ्या टप्प्यासाठी 13 मे रोजी होणार मतदान

नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड अशा अकरा मतदारसंघामध्ये होणार मतदान


सुमारे 2 कोटी 28 लाखांपेक्षा जास्त मतदार ; यंत्रणा संपूर्ण तयारीसह सज्ज



मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम


               




मुंबई : राज्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील अकरा मतदार संघासाठी 13 मे रोजी मतदान होत असून असून निवडणूक यंत्रणा सज्ज आहे. त्यासाठी प्रत्यक्ष निवडणूककरिता लागणारे साहित्य, साधनसामुग्री मतदान केंद्रावर पुरविण्यात आलेली आहे. मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान करावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी केले.


            


मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. चोक्कलिंगम बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी उपस्थित होते.


            


यावेळी माहिती देताना श्री. चोक्कलिंगम म्हणाले, तिसऱ्या टप्प्यात रायगड, बारामती, धाराशीव (उस्मानाबाद), लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या अकरा मतदारसंघात 7 मे रोजी मतदान घेण्यात आले. तिसऱ्या टप्प्यात एकूण सरासरी 63.55 टक्के मतदान झाले.


            


चौथ्या टप्प्यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड अशा अकरा मतदारसंघामध्ये 13 मे रोजी मतदान घेण्यात येणार आहे.


             


यासाठी एकूण २३ हजार २८४ मतदान केंद्रांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून या निवडणुकीत २ कोटी २८ लाख १ हजार १५१ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. या अकरा मतदार संघासाठी बॅलेट युनिट (बीयु) ५३,९५९ तर कंट्रोल युनिट (सीयु) २३,२८४ आणि २३,२८४ व्हीव्हीपॅट उपलब्ध असून चौथ्या टप्प्यात एकूण २९८ उमेदवार निवडणूक लढविणार असल्याची माहिती त्यांनी दिली.


            


85 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना तसेच दिव्यांग मतदारांना त्यांच्या इच्छेनुसार गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्राच्या ठिकाणी रॅम्पची व व्हिलचेअरची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.


            


मतदान संपण्याच्या वेळेच्या 48 तास आधी अकराही लोकसभा मतदार संघामध्ये सायलन्स पिरियड (Silence Period) आहे. या लोकसभा क्षेत्रामध्ये 48 तास आधी प्रचार करता येत नाही. तसेच या मतदार संघातील रहिवासी नसलेली व्यक्ती राजकीय प्रचारासाठी या क्षेत्रात राहू शकत नाही, असे आयोगाचे निर्देश आहेत

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.