Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हलकर्णी येथे बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी



हलकर्णी (वार्ताहर) :  येथील लिंगायत समाज बांधवांच्या वतीने  धर्म संस्थापक महात्मा श्री बसवेश्वर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. 




हिटणी येथील बसवण्णा मंदिरातून पहाटे बसव ज्योत आणण्यात आली. बसव भवन, बाजारपेठ येथे महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन दुंडापा रामाजीगोळ यांच्या हस्ते करण्यात आले. पालखी पूजन, पाळणा हलवणे हा कार्यक्रम महिलांच्या पार पडला. यावेळी गावातून मिरवणूक काढण्यात आली. आकर्षक सजवलेल्या बैलजोड्या, वाद्याचा गजर, 'बसवेश्वर महाराज की जय'चा जयघोष पहावयास मिळाला. सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचा लाभ हजारो ग्रामस्थांनी घेतला.




यावेळी ग्रामपंचायत सदस्य इरय्या हिरेमठ, अमेय हत्तरकी, शिवकुमार संसुद्धी, लकाप्पा बसर्गे, गजानन हलींगले, गजानन शिरहट्टी, सचिन कुंभार, राकेश गोटूरे, गिरीश कळविकट्टे, विजय लोहार, अमित कंगुरी, रोहित मुंगुरवाडी, श्रेयस हत्तरकी, महेश अगसीमनी, शंकर हत्तरकी, सतीश गोटूरे, विशाल मुगूूंरवाडी यांच्यासह  लिंगायत बांधव,  ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 कार्यक्रमाचा व्हिडिओ येथे पहा 👇








Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.