Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

'संत गजानन' अभियांत्रिकी मध्ये एमसीए अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता




कोल्हापूरनंतर ग्रामीण भागात प्रथमच हा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी परवानगी 


गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाला एमसीए (मास्टर ऑफ कॉम्प्युटर एप्लीकेशन) हा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी मान्यता मिळाली आहे. या कोर्सला एआयसीटीई ने मान्यता दिली असून शिवाजी विद्यापीठ यासाठी संलग्नित आहे कोल्हापूर नंतर ग्रामीण भागात प्रथमच हा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी येथे परवानगी मिळाल्याची माहिती प्राचार्य डॉ. एस एच सावंत यांनी दिली.



हा कोर्स दोन वर्षाचा असून साठ प्रवेश क्षमता आहे. यासाठी बीई, बीसीए, बीटेक, बीएससी, बीए, बी कॉम, पदवी पन्नास टक्के गुणांनी उत्तीर्ण व एमसीए प्रवेश पात्रता परीक्षा सीईटी देणारे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात हा कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना आयटी क्षेत्रात भरपूर करिअरची संधी उपलब्ध आहेत शिवाय फिनिशींग  स्कूल अंतर्गत आयटी मधील आधुनिक कोर्सची प्रशिक्षण देऊन कॉलेज अंतर्गत नोकरीच्या विविध संधी उपलब्ध होणार आहे या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना ईबीसी व शिष्यवृत्ती ही मिळणार असल्याने प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी समन्वयक प्रा. महेश भांदिगरे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.