Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

खासदार श्री शाहू छत्रपती यांनी घेतली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट



मुंबई : कोल्हापूरचे नवनिर्वाचित खासदार श्री शाहू छत्रपती महाराजांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. 


यावेळी श्री. ठाकरे यांनी महाराजांना शुभेच्छा देत अभिनंदन केले. कोल्हापूर लोकसभा मतदार संघासाठी शाहू महाराजांच्या सारखे अनुभवी व सुसंस्कृत नेतृत्व लाभले असून त्यांच्या माध्यमातून कोल्हापूरचा विकास होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.




यावेळी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे, कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.