उपशहर प्रमुख काशिनाथ गडकरी यांच्या नेतृत्वाखाली प्रांत अधिकारी यांना निवेदन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): अंत्योदय रेशनकार्डवरील लाभार्थ्यांना साडी वाटप करण्याची मागणी ठाकरे शिवसेना पक्षाचे उपशहर प्रमुख काशिनाथ गडकरी यांच्या नेतृत्वाखाली प्रांत अधिकारी मल्लिकार्जुन माने यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे.
अंत्योदय लाभार्थ्यांना दरमहा 20 किलो गहू, दहा किलो तांदूळ दिले जाते. शासनाने 10 नोव्हेंबर 2023 रोजी या लाभार्थ्यांना दिवाळी भेट म्हणून साडी वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार साडी वाटपाचे आदेशही देण्यात आले. मात्र लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्याने साडी वाटप करण्यात आले नव्हते. आता आचारसंहिता शिथील झाल्याने लाभार्थ्यांना साड्यांचे वाटप करण्यात यावे अशी मागणी या निवेदनातून केली आहे. यावेळी उपशहर प्रमुख काशिनाथ गडकरी, शिवसैनिक लक्ष्मण पाच्छापुरे, अमित कोरी, निखिल सुतार, सुभाष जरळी उपस्थित होते.

