गडहिंग्लज (प्रतिनिधी): चार दिवसापूर्वी गडहिंग्लज शहरातील धोकादायक आणि अनाधिकृत होर्डिंग स्टॅन्ड हटविण्यात यावीत याकरिता गडहिंग्लज नगरपरिषदचे मुख्याधिकारी यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांच्या नेतृत्वाखाली निवेदन दिले होते. या पार्श्वभूमीवर आज प्रशासनाने याची दखल घेत शहरातील होर्डिंगवर कारवाई करण्यास सुरवात केली.
सकाळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी होर्डिंगची पाहणी केली. त्यानंतर मुख्याधिकारी यांनी शहरातील धोकादायक होर्डिंगवर तात्काळ कारवाईचे आदेश दिले.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, मनविसे जिल्हाध्यक्ष प्रभात साबळे , गडहिंग्लज शहराध्यक्ष केम्पना कोरी , सचिव वैभव माळवे, बबलू सुभेदार, संदीप कुरबेट्टी, प्रथमेश शिंत्रे, सचिन देशपांडे ,अझीम पठाण, सुनील कांबळे, विनायक शेटके आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
आमच्या युट्युब चॅनेलवर बातमी पाहण्यासाठी 👇


