संस्थापक अध्यक्ष ॲड. आण्णासाहेब चव्हाण यांचे मत
प्रवेश प्रक्रिया सुविधा केंद्राचे उदघाटन
सुलभ प्रवेश प्रक्रियेसाठी आठ ठिकाणी सुविधा केंद्रे

हसुरवाडी: येथील संत गजानन शिक्षण समूहाचा निसर्गरम्य परिसर.
गडहिंग्लज (प्रतिनिधी): वैद्यकीय शिक्षणाबरोबर अभियांत्रिकी शिक्षणाचे कवाडे खुले करणाऱ्या संत गजानन शिक्षण समूहाने दर्जेदार शिक्षणाबरोबरच दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांना नोकरी व व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिला जातो, यामुळेच प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची पहिली पसंत म्हणून संत गजानन महाराज शिक्षण समूहाकडे ओघ सुरू असल्याचे मत महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज शिक्षण समूहाचे संस्थाध्यक्ष ॲड. आण्णासाहेब चव्हाण यांनी येथील विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया सुविधा केंद्राच्या उदघाटन प्रसंगी व्यक्त केले.
![]() |
| संस्थापक अध्यक्ष ॲड. अण्णासाहेब चव्हाण |
सध्या समूहाच्या अभियांत्रिकीकडील इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक वैद्यकीय शाखेतील बीएएमएस, फार्मसी, पीजी डीएमएलटी, बीएससी नर्सिंग, डीएड, पीजी एमएलटी, पीजी एमआरआय, बीएससी ऑप्टोमेट्री कोर्ससाठी तात्पुरती प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. ठिकठिकाणच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी यासाठी आठ ठिकाणी शासनमान्य सुविधा केंद्र सुरू करण्यात आला आहे. यासाठी विद्यार्थी व पालक वर्गातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
सध्या पॉलिटेक्निक अभ्यासक्रम प्रवेशासाठी तंत्रशिक्षण संचालनालय यांच्या वतीने ऑनलाईन पोर्टल सुरू केला आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना नोंदणी व निश्चिती करता येणार आहे. यासाठी २८ जून ही अंतिम तारीख आहे.
प्रवेश प्रक्रियेसाठी आठ ठिकाणी सुविधा केंद्रे
चंदगड येथे रामानुंज अकॅडमी कॉलेज रोड, मुदाळ तिट्टा रोहतकर स्टोअर्स कोल्हापूर रोड, उत्तुर. अवी कॉम्प्युटर्स, आजरा. गजरे बिल्डिंग संभाजी चौक, कापशी. निर्मला कॉम्प्युटर,कोवाड. सर्व्हर कॉम्प्युटर्स निटूर रोड, गडहिंग्लज येथील डॉ. राजेंद्र प्रसाद रोड, निपाणी येथील साई झेरॉक्स जुना पी.बी.रोड.या ठिकाणी सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे. यामध्ये ऑनलाईन फॉर्म भरणे, विविध कोर्सची माहिती, प्लेसमेंट, शंका समाधान याबाबत मार्गदर्शन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. तरी या सुविधाचा लाभ घ्यावा असे आवाहन संत गजानन शिक्षण समूहाकडून करण्यात आले आहे.

