सरपंच गिरिजादेवी शिंदे यांच्या वतीने दहावी व बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार कौतुक सोहळा
गडहिंग्लज (प्रतिनिधी): नेसरीच्या सरपंच गिरिजादेवी शिंदे यांच्या वतीने दहावी व बारावी परीक्षेत यश प्राप्त केलेल्या नेसरी व परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा रविवार दि. १६ जून रोजी सकाळी ९ वाजता विठ्ठल दिप हॉल नेसरी येथे आयोजित केला आहे. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी व मार्गदर्शन करण्यासाठी पाठ्यपुस्तकातील क्यूआर कोडचे जनक व ७ कोटी रुपयांचा ग्लोबल टीचर पुरस्कार प्राप्त शिक्षक डॉ. रणजीत डिसले गुरुजी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेसरीच्या सरपंच गिरिजादेवी शिंदे असणार आहेत. या कार्यक्रमाचा लाभ विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

