गडहिंग्लज (प्रतिनिधी): शिवसेना नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर जिल्हा ग्रामीण यांच्या वतीने गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालय यात रुग्णांना फळे वाटप करण्यात आली.
यावेळी कोल्हापूर जिल्हा युवासेना अधिकारी अवधूत पाटील, शिवसेना गडहिंग्लज तालुका प्रमुख दिलीप माने, युवासेना गडहिंग्लज तालुका प्रमुख सागर हेब्बाळे, युवासेना आजरा तालुका प्रमुख रोहित डावरे, उप तालुका प्रमुख विशाल चव्हाण, शहर समन्वयक तेजस घेवडे, शिवसेना उपशहर प्रमुख संदीप चव्हाण, शिवसेना विभाग प्रमुख दिगंबर पाटील, अक्षय रेडेकर, सौरभ जाधव, तुकोजी जाधव यांच्यासह युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


