Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लजला एम.आर. हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये विविध उपक्रमांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती



गडहिंग्लज (प्रतिनिधी): एम.आर. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज गडहिंग्लज येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची 150 वी जयंती विविध उपक्रम यांनी उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी मलिकार्जुन माने होते, तर प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार ऋषिकेश शेळके उपस्थित होते.




यावेळी उपविभागीय अधिकारी मलिकार्जुन माने, तहसीलदार ऋषिकेश शेळके व प्राचार्य संजय कुंभार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाला नायब तहसीलदार विष्णू बुट्टे, सहाय्यक गटविकास अधिकारी सुधाकर खोराटे, बाल विकास प्रकल्पाधिकारी श्री.शिनगारे,  विद्यालयातील शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत प्रा. विनोद शिंदे यांनी तर आभार प्रा. रोहिणी सोहनी यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.