गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज तालुका ग्राहक पंचायत अध्यक्षपदी ईश्वर नारायण देसाई (ऐनापुर), उपाध्यक्षपदी तानाजी केदारी कुराडे (येणेचवंडी), डॉ. महादेव ज्ञानदेव ढोकरे -पाटील, सचिवपदी अनिल लक्ष्मण कलकुटकी (गडहिंग्लज) यांची निवड करण्यात आली.
कार्यकारणीमध्ये सहसचिव म्हणून सौ रत्ना उत्तम सुतार (हलकर्णी), मार्गदर्शक सल्लागार - बाळेश नाईक (बसर्गे), संघटक महादेव शिंगे (भडगाव), सहसंघटक प्रा. सुरेश वडराळे, तर महिला संघटक श्रीमती रोहिणी श्रीराम चौगुले (कडगाव), कोषाध्यक्ष-सचिन मारुती लोहार (गिजवणे )सदस्य अनिल तुकाराम शिंदे (हिरलगे ) यांचा समावेश आहे.
ग्राहक पंचायतीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष बी. जे. पाटील, सल्लागार ॲड. विवेक पाटील, गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुका विभागीय अध्यक्ष श्री शिवाजीराव गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत नूतन पदाधिकारी यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. स्वागत व प्रास्ताविक विभागीय अध्यक्ष शिवाजीराव गुरव यांनी केले. यावेळी ग्राहक पंचायतीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष बी. जे. पाटील. सल्लागार ॲड.विवेक पाटील यांनी संघटनेच्या कार्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. आभार अनिल कलकुटकी यांनी मानले.


