Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

समाजरत्न डॉ. गंगाधर व्हसकोटी यांच्यावर वाढदिवसानिमित्त विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव

वाढदिवसानिमित्त हलकर्णी जिल्हा परिषद मतदार संघात विविध सामाजिक उपक्रम


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या भ्रमणध्वनीवरून शुभेच्छा 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): हलकर्णी येथील सामाजिक कार्यकर्ते समाजरत्न डॉ. गंगाधर व्हसकोटी यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमानी  उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले. हलकर्णी जिल्हा परिषद मतदार संघातील विविध गावांमध्ये डॉ. व्हसकोटी यांना शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांची गर्दी दिसून आली. विविध स्तरातील मान्यवर व नेते मंडळींनी डॉ. व्हसकोटी यांना शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांची दिवसभर रीघ लागली होती.



सकाळी गुरूसिद्धेश्वर महास्वामीजी कारीमठ, गुरुसिद्धेश्वर महास्वामीजी (अडी) गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामीजी नूल, गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी शिमोगा यांच्या हस्ते डॉ. व्हसकोटी यांचा नूल येथे सत्कार करण्यात आला. डॉ. व्हसकोटी यांनी स्वामीजींचा आशीर्वाद घेतला व हलकर्णी जिल्हा परिषद मतदार संघातील सर्व गावांना भेटी दिल्या. शुभेच्छा स्वीकारल्या व वह्यांचे वितरण करण्यात आले. गावोगावी शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




डॉ. व्हसकोटी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी दरवर्षी नागरिक दूरवरून येतात. यावर्षी मतदारसंघातील प्रत्येक गावांना भेटी देऊन त्यांनी शुभेच्छा स्वीकारल्या व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. यावेळी अनिल कुराडे, उपसरपंच सलीम यमकमर्डी, उमेश इंगळे, अशोक पुजेरी, पुंडलिक भोसले, उत्तम जाधव, महम्मदहनीफ ताशिलदार, अजित पाटील, विजय जाधव, मारुती पाटील, बाबुराव  खामकर, रमेश देसाई, अरुण मोकाशी, रोहन पाटील यांच्यासह प्रत्येक गावामध्ये ग्रामस्थ, विविध संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



डॉ. नंदाताई बाभुळकर यांनी दिल्या शुभेच्छा  




माजी विधानसभा सभापती स्व. बाबासाहेब कुपेकर यांच्या कन्या व चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या नेत्या डॉ. नंदाताई बाभुळकर यांनी हलकर्णी येथे भेट देऊन  डॉ. गंगाधर व्हसकोटी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा मजूर संघाचे माजी चेअरमन उदयराव जोशी, मनवाडचे माजी सरपंच ज्ञानप्रकाश रेडेकर, सत्याप्पा पाटील, सतीश थोरात, भीमराव चौगुले, बाळकृष्ण गवळी, मारुती पाटील, अजित पाटील, महाबळेश्वर कापसे, राजू दड्डीकर, काशिनाथ कांबळे, अशोक पाटील, हसन मुल्लाणी, इम्रान मकानदार, हनीफ ताशिलदार, सरदार परीट, युसुफ गवंडी, शाहिद गवंडी, जुबेर कादरभाई, संजय चौगुले, शोयब पानारी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.



माजी सभापती अमरसिंह चव्हाण यांच्याकडून शुभेच्छा




शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी सभापती अमरसिंह चव्हाण यांनी हलकर्णी येथे भेट देत डॉ. गंगाधर व्हसकोटी यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत कार्यकर्ते उपस्थित होते.



विविध नेते मंडळीकडून डॉ. व्हसकोटी यांना भ्रमणध्वनीवरून शुभेच्छा 


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी आमदार महादेवराव महाडिक, अमोल महाडिक, खासदार धनंजय महाडिक, गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, माजी चेअरमन विश्वास पाटील, राहुल देसाई, राहुल पाटील आदी मान्यवरांनी भ्रमणध्वनीद्वारे डॉ. गंगाधर व्हसकोटी यांना शुभेच्छा दिल्या.


 व्हिडिओ येथे पहा 👇








Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.