पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे गौरवोद्गार
गडहिंग्लजमध्ये सेवानिवृतीनिमित्त सत्कार
गडहिंग्लज (प्रतिनिधी): सेवानिवृतीनंतर माणसाने आपल्याला इतर समाजोपयोगी कामामध्ये गुंतवून घ्यावे व आपला मोकळा वेळ सत्कारणी लावावा. रफिक पटेल यांनी सेवानिवृत्त लोकांची संघटना उभी करून त्यांच्या पुढील आयुष्यासाठी मार्गदर्शन करावे. ते काम करण्याची त्यांच्यात क्षमता आहे, असे गौरवोद्गार कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे वैद्यकिय शिक्षण व विशेष सहाय मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्राचार्य रफिक पटेल यांच्या सेवानिवृत्ती समारंभात काढले. कार्यक्रमाच्या अध्यस्थानी चंद्रकांत गुजर होते.
साधना हायस्कूल व ज्यूनि. कॉलेज, गडहिंग्लज येथून विद्यार्थी ते प्राचार्य पदापर्यंत ३५ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. रफिक पटेल यांचा सपत्नीक सत्कार पालकमंत्री हसन मुश्रीफ व सौ. फिलॉन बारदेस्कर यांच्या हस्ते झाला.
पालकमंत्री श्री. हसन मुश्रीफ म्हणाले, प्राचार्य श्री. पटेल हे कुशल संघटक आहेत. शिक्षण, समाजकारण व राजकारण या क्षेत्रात त्यांचा लिलया वावर आहे. त्यांच्या या संघटन कौशल्याचा समाजासाठी उपयोग व्हावा. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करावा तितके कमीच आहे. त्यांनी आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाने सर्वांची मने जिंकली, असल्याचे सांगितले.
सत्काराला उत्तर देताना प्राचार्य रफिक पाटील म्हणाले, शिक्षकीपेशा नोकरीपेक्षा खरे तर एक मोठे व्रत आहे. आयुष्यभर निस्पृहपणे ज्ञानदानाचे काम केल्याचे समाधान आहे. यापुढील आयुष्यही सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सामाजिक कार्यासाठीच व्यतीत करणार आहे.
डॉ. किरण खोराटे, एल. एस. पाच्छापूरे, शिक्षक आमदार जयंत आसगावकर, माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुखे, शिक्षक नेते दादा लाड, डीवायएसपी रामदास इंगवले, जे. बी. बारदेस्कर यांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राहूल पोवार, जिल्हा शिक्षकेत्तर संघटनेचे अध्यक्ष बाबा पाटील, सतीश पाटील, किरण कदम, प्रकाशभाई पताडे, ॲड. हेमंत कोलेकर, बाबासाहेब पाटील, एम. डी. पाटील बी. जी. काटे, डॉ. सदानंद पाटणे, डॉ. नागेश पट्टणशेट्टी, सदानंद वाली, के. बी. पोवार, डॉ. एम. एस. बेळगुद्री, बाळासाहेब घुगरी, सचिन शिंदे, विरुपाक्ष पाटणे, विनायक नाईक, प्रा. शिवाजीराव होडगे, परशराम हरेर, अनिल देशमुख, एकनाथ देसाई, अनिल पाटील, संजय घोडके, आप्पा भाट, कुमार घारू, संपत सावंत यांची प्रमुख उपास्थित होती.
स्वागत व प्रास्ताविक अरविंद बारदेस्कर यांनी केले. सुरेश दास यांनी मानपत्राचे वाचन केले. सुत्रसंचालन गणपतराव पाटोळे, निलोफर शेख यांनी केले. आभार प्राचार्य इनास कुटीन्हो यांनी मानले.






