Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिवराज कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये एक्झीट परीक्षेसाठी कार्यशाळा संपन्न



गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये फार्मसीच्या एक्झीट परीक्षेसाठी कार्यशाळा संपन्न झाली. शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. तर शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे, जे. बी. बारदेस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती.



यावेळी शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, भारतीय फार्मसी कौन्सिल वेळोवेळी औषध निर्माण शास्त्राचा स्तर वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. फार्मसीची एक्झीट परीक्षा हा त्याचाच परिपाक आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी  आपले ज्ञान कौशल्य वाढविणे गरजेचे आहे. प्राचार्य डॉ. राहुल जाधव यांनी विद्यार्थ्यांच्या मनात या परीक्षेविषयी असलेली नाहक भीती व संभ्रम दूर करून या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थी रजिस्टर फार्मासिस्ट म्हणून काम करू शकतात असे सांगितले. फार्मसी कॉलेज लिंब जि. सातारा येथील प्राचार्य व्ही.एन.राजे तसेच जीपॅट डिस्कशन सेंटर प्रा.लि.च्या रिचा पावा यांनी यावेळी मार्गदर्शन करताना स्पष्ट केले कि, ही परिक्षा आजवर आपण घेतलेल्या ज्ञानाची कसोटी असणार आहे  त्याचबरोबर या परीक्षेचे स्वरूप कसे असेल याविषयी राष्टीय स्तरावरील दूरदृष्टीपणा याचे विश्लेषण केले. 



या कार्यशाळेसाठी फार्मसी मधील डिप्लोमाधारक विद्यार्थी- विद्यार्थिनी  उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. स्नेहल दळवी यांनी केले. आभार प्रा. पूजा गुरव यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.