शंभर वड वृक्षाचे केले वाटप
वृक्ष संवर्धनाविषयी केली जनजागृती
गडहिंग्लज (प्रतिनिधी): "पतीच्या दीर्घायुष्यासाठी निष्ठेचे बंधन, सात जन्माच्या सोबतीसाठी जन्मोजन्मीचे समर्पण साजरा करण्याचा महिलांचा दिवस म्हणजे वटपोर्णिमा" हा दिवस होय. या दिवशी माता-भगिनी वडाचे पूजा करून प्रार्थना करतात पण या झाडाचे महत्व व संवर्धन कसे करावे याची माहिती व्हावी यासाठी महागाव (तालुका गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज आयुर्वेदिक महाविद्यालयात आज महिलांना व महिला कर्मचाऱ्यांना वटवृक्ष वाटप कार्यक्रम आयोजन करण्यात आले. यावेळी शंभर वट वृक्षाचे वाटप करून त्याचे महत्त्व सांगण्यात आले.
यावेळी डॉ. संगीता मनगुळे यांनी सर्वांचे स्वागत केले. प्रारंभी प्राचार्या डॉ. मंगल मोरबाळे यांच्या हस्ते वृक्षारोप वाटप करण्यात आले. यावेळी प्राचार्या डॉ. मोरबाळे म्हणाल्या म्हणाल्या " वटपौर्णिमेच्या दिनानिमित्त आम्ही शंभर वटवृक्षाचे वाटप करीत आहोत. पर्यावरण रक्षणासाठी झाडे लावली पाहिजे. वडाचे झाड अत्यंत आरोग्यदायी व दीर्घायुषी असून सर्वाधिक प्राणवायू देणाऱ्या या झाडाला पर्यावरणात महत्त्वाचे स्थान आहे. यावेळी इतर उपयुक्त झाडाबद्दल महत्व सांगून 'निसर्ग वाचला तर सृष्टी वाचेल'या भावनेतून प्रत्येकाने एक झाड लावून त्याचे संवर्धन करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले".
यावेळी प्राचार्या रोहिणी पाटील, प्रा कल्याणी चव्हाण, प्रा.रूपाली परीट , प्रा.अर्चना मगदूम, डॉ. समिधा चौगुले, प्रा.निलोफर पठाण,प्रियांका टेंभुगुडे, पल्लवी देशपांडे, स्नेहल रावण, दीपा पाटील, शीतल पाटील, उर्मिला शेवाळे ,यासह कर्मचारी उपस्थित होते.


