Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कोल्हापुरातील सायबर चौकात अंगावर काटा आणणारा अपघात

भरधाव कारने सहा जणांना चिरडले 


तिघा जणांचा जागीच मृत्यू, सहा जण गंभीर जखमी 





कोल्हापूर : कोल्हापुरातील सायबर चौकात एका भरधाव कारने सहा जणांना चिरडले. यामध्ये तिघा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने कोल्हापुरात अक्षरशः धावपळ उडाली. सदर कार ही शिवाजी विद्यापीठाचे माजी प्रभारी कुलगुरू यांची असल्याची माहिती समोर आली आहे. कारवरील ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. या अपघातात कार चालकासह तिघांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.




या दुर्घटनेची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. अक्षरशा हा अपघात पाहणाऱ्यांचा थरकाप उडाला. सीसीटीव्ही फुटेज व प्रत्यक्ष अपघात पाहिलेल्यांच्या अंगावर काटा उभा राहिला. काही क्षणातच या भराव कारने लोकांना चेंडू प्रमाणे उडवले. या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.