चौदाव्या फेरीअखेर कोल्हापूरचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्री शाहू छत्रपती यांना 92 हजार 684 मतांची आघाडी
मुंबई : लोकसभा निवडणूक निकालात महाराष्ट्रातील कल हा महाविकास आघाडीच्या दिशेने सरकत असल्याचे चित्र दिसत आहे. 30 जागांवर महाविकास आघाडी आघाडीवर आहे. देशातील एकूण 543 जागांपैकी सुरत येथील एक जागा बिनविरोध झाल्याने 542 जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. महाराष्ट्र राज्यात एकूण 48 जागा आहेत. पैकी सध्या महायुती 17 व महाविकास आघाडी 30 असा कल दिसत आहे. यामध्ये भाजप 10, शिंदे शिवसेना 5, अजित पवार राष्ट्रवादी 1, ठाकरे पक्ष शिवसेना 11, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी 8, काँग्रेस 11, इतर 1 असा कल आहे. दरम्यान, कोल्हापूर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार श्री शाहू छत्रपती यांचे मताधिक्य कायम आहे. चौदाव्या फेरीपर्यंत श्री शाहू छत्रपती यांना 92 हजार 684 मताची आघाडी आहे.
देशातील निकालाचा कल पाहता एनडीए 298, इंडिया आघाडी 226, इतर 19 असा कल दिसत आहे. मोठ्या फरकाने मताधिक्य असलेल्या उमेदवारांच्या समर्थकांनी ठिकठिकाणी जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे.

