गडहिंग्लज (प्रतिनिधी): तालुक्यातील हलकर्णी येथे शाळा, महाविद्यालयांसह विविध ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.
हलकर्णी भाग हायस्कूलमध्ये विद्या पोतदार यांनी योग दिनाचे महत्त्व आणि गरज सांगितले. एस बी पाटील यांनी प्रात्यक्षिक करून घेतले आणि योगासन स्पर्धा, प्राणायाम बाबत माहिती दिपाली बंदी यांनी दिली. यासाठी प्राचार्य आर एस पाटील यांची प्रेरणा लाभली.
हलकर्णी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा झाला. योग शिक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी संदीप नाथबूवा, भाजपचे सरचिटणीस अविनाश दुध्यागोळ, युवा मोर्चा उपाध्यक्ष अमरदीप व्हसकोटी, सुनील लब्यागोळ, सुमित ढंगणावर उपस्थित होते.
विद्यामंदिर गांधीनगरमध्ये जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आरोग्य सेविका अर्चना शिंदे, राजश्री सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्याध्यापिका वैशाली जोशीलकर यांनी योगचे प्रात्यक्षिक करून दाखविले. यावेळी मुख्याध्यापिका वैशाली जोशीलकर, लावण्या मनगुते यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.





