Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आंबेओहोळ धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत तातडीने बैठक घ्यावी, अन्यथा आंदोलन!

कॉम्रेड शिवाजी गुरव यांचा निवेदनातून इशारा 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): आंबेओहोळ धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत तातडीने बैठक घ्यावी, अन्यथा २ जुलैपासून गडहिंग्लज उपविभागीय अधिकारी करायलासमोर आंदोलन करण्याचा इशारा आंबेओहोळ धरणग्रस्त संग्राम संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड शिवाजी गुरव यांनी निवेदनातून  दिला आहे. 




या निवेदनात म्हटले आहे की, आंबेओहोळ धरणगग्रस्तांची पुनर्वसन प्रक्रिया मंदावलेली असून धरणामध्ये पाणीसाठा झाला आहे, मात्र ज्यांनी आपल्या जमिनी धरणासाठी दिल्या त्या शेतकयांची कुचेष्टा केली जात आहे. ज्या शेतकयांना जमीन मिळाली त्यांना त्यांच्या मागणीनुसार भूखंड मिळणे अपेक्षित होते. आजरा येथे दिनांक 29/12/2021 रोजी पुनर्वसन अधिकाऱ्यांनी कॅम्प लावून भूखंड मागणीचे फॉर्म भरून घेतले होते; त्याप्रमाणे वाटप होणे अपेक्षित होते मात्र लिंगनूर येथे ज्यांनी मागणी केली त्यांना मागे ठेवले गेले. 


मात्र ज्यांनी प्राधान्य क्रमाने मागणी केली त्यांना डावलण्यात येऊन कडगाव (ता. गडहिंग्लज) येथील भूखंड वाटप करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र सदर भूखंड अपुरी कामे, रस्ते, पाणी, विज, शाळा अशा विविध अत्यावश्यक व गैरसोयीची असल्याने शेतकऱ्यांनी स्वीकारले नाहीत. तसा सविस्तर अहवालही कडगांव तलाठी यांनी वरिष्ठांकडे पाठवलेला आहे. त्यामुळे कडगांव येथील भुखंड कोणीही स्विकारले नाहीत. मात्र वाटप करण्याचा सेवा पूर्ण नसणे


 लिंगनूर येथील भूखंड शिल्लक असताना दुसऱ्या ठिकाणी वसाहतीची गरजच नाही कारण बऱ्याच शेतकऱ्यांनी पॅकेज स्वीकारले आहे. पूर्वी धरणग्रस्तांची संख्या लक्षात घेऊन दोन जागी वसाहती करण्यात आल्या होत्या, मात्र नियोजनानंतर पुनर्वसनासाठी जमिनी पुरेशा नाहीत हे लक्षात आल्यानंतर राज्य सरकारकडून पॅकेजबाबत निर्णय झाला. त्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांनी आर्थिक पॅकेज घेतले आहे. सध्याची जमीन घेतलेल्या धरणग्रस्तांची संख्या विचारात घेतल्यास दोन जागी वसाहती करण्याचे कारण नाही. त्यामुळे लिंगनूर येथील भूखंड मिळावेत. तसेच ज्यांना अद्याप जमिनी मिळाल्या नाहीत त्यांना जमिनी देऊन पुनर्वसन करावे.


संकलन दुरुस्ती करावी. बरेच लोक पॅकेज घेणेस तयार आहेत त्यांच्यापर्यंत सरकारी यंत्रणा पोहोचतच नाही. अशा शेतकऱ्यांना आपसातील वाद मिटून पुनर्वसन होणे सोपे जाईल. याबाबत विचार विनिमय योग्य चर्चा करण्यासाठी संघटनेसोबत बैठक होणे गरजेचे आहे. लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार घातल्यानंतर बैठकीचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले होते त्यानंतर बहिष्कार मागे घेण्यात आला होता. येत्या 1 जुलै  पर्यंत बैठक न घेतल्यास दिनांक 2 जुलै  पासून उपविभागीय अधिकारी गडहिंग्लज यांच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनातून कॉम्रेड शिवाजी गुरव यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.