गडहिंग्लज (प्रतिनिधी): छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे शतकोत्तरी सुवर्ण महोत्सवी वर्ष संपन्न होत आहे. त्यानिमित्ताने महात्मा गांधी विचार मंच, गडहिंग्लज यांच्यावतीने आठवी ते बारावी या गटासाठी दिनांक २६ जून रोजी सकाळी दहा वाजता तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा महागाव येथील महात्मा फुले विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे होणार आहे.
या स्पर्धसाठी प्रथम क्रमांक १००१ व प्रमाणपत्र,द्वितीय क्रमांक ७०१ व प्रमाणपत्र,तृतीय क्रमांक ५०१/- व प्रमाणपत्र, दोन उत्तेजनार्थ : रु. २५१/- व प्रमाणपत्र अशी बक्षिसे आहेत. या स्पर्धेचे विषय शाहू महाराजांचे शैक्षणिक कार्यातील योगदान, शाहू महाराजांचे मागासवर्गीयांच्या उद्धाराचे कार्य, राजर्षी शाहू महाराज आणि शेती व उद्योगधंदे, रयतेचा राजा - राजर्षी शाहू महाराज विषय आहेत. अधिक माहितीसाठी प्रा. पी. डी. पाटील मो. नं. ८८८८५०४०१० व प्रकाश चौगुले ९८२२५८५९११ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.


