Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

पर्यावरण रक्षणात विद्यार्थ्यांची जबाबदारी महत्त्वाची : वनपाल एस.एस. पाटील

महागावच्या महात्मा फुले विद्यालयात पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): शालेय  विद्यार्थी भविष्यातील भारताचे सुज्ञ नागरिक आहेत. देशाच्या जडणघडणीत पर्यावरण संवर्धन करणे गरजेचे आहे. पूर्वाजांनी आताच्या पिढीला दिलेला हा फार मोठा वारसा आहे. आपल्या देशात वनक्षेत्र कमी होत आहे. जंगलाचे आच्छाद वाढणे गरजेचा आहे. वनक्षेत्र वाढवण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच आपल्या अवतीभवती जंगलांना लागणाऱ्या आगी रोखण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. म्हणून विद्यार्थ्यांची पर्यावरण रक्षणात जबाबदारी खूप महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन सामाजिक वनीकरण विभाग परिक्षेत्राचे वनपाल एस. एस. पाटील यांनी केले.




महागाव येथील महात्मा फुले विद्यालयात हरित सेना विभाग व सामाजिक वनिकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरणदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य आहेस पाटील होते. तर संस्था प्रतिनिधी आण्णासाहेब पाटील, पर्यवेक्षक मोहन कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.




    

प्रास्ताविक प्रकाश चौगुले यांनी केले. यावेळी पर्यवेक्षक मोहन कांबळे यांनी विद्यार्थ्यांना वनसंपदा वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. पर्यावरण दिनानिमित्त शालेय परिसरात करंज, कडुनिंब, पिंपळ, कदंबा, वड, मोहगनी यांची ५० झाडांचे वृक्षारोपन केले. सूत्रसंचालन किरण पाटील यांनी तर आभार संदेश कोकितकर यांनी मानले.


     



यावेळी वनसेवक बी. एम. कुरबेटी, आर. आर. पाळेकर, अनिल हलकर्णीकर, रविंद्र पाटील,महेश पाटील, एकता पाटील, रमेश कळविकट्टे, कुलदिप देसाई, सुवर्णा शेवाळे, शांताराम वाघराळीकर, नरसू कांबळे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन किरण पाटील यांनी केले. आभार संदेश कोकितकर यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.