Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

'गोडसाखर'चे व्हॉइस चेअरमन प्रकाशराव चव्हाण यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

विविध मान्यवरांसह कार्यकर्त्यांनी दिल्या शुभेच्छा





गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज साखर कारखान्याचे व्हॉइस चेअरमन प्रकाशराव चव्हाण यांचा 71 वा वाढदिवस विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी विविध मान्यवरांसह कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या.




स्वागत व प्रास्ताविक सेवानिवृत्त शिक्षक राजाराम सुतार गुरुजी यांनी केले. यावेळी प्रकाशराव चव्हाण यांचे औक्षण त्यांच्या सौभाग्यवती सौ.रेखा चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर केक कापण्यात आला. श्री महालक्ष्मी यात्रा कमिटीचे अध्यक्ष, संत बाळूमामा मंदिर कमिटीचे अध्यक्ष व  माजी उपनगराध्यक्ष रमेश रिंगणे यांनी श्री चव्हाण यांना वाढदिवसानिमित्य शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी आजपर्यंत केलेल्या विविध सामाजिक कार्य, राजकीय कारकीर्दीबद्दल माहिती सांगितली.



 

जवाहर घुगरे यांनी वाढदिवसाचे शुभेच्छापर गीत गाऊन शुभेच्छा दिल्या. जीवन विद्या मिशन मार्फतही मंगलगीतातून शुभेच्छा दिल्या. यावेळी बाळूमामा मंदिर समितीचे उपाध्यक्ष विठ्ठल भमानगोळ, सचिव चंद्रकांत सावंत, चन्नेकुपीचे माजी सरपंच संदीप चव्हाण, युसुफ गवसेकर, आनंद पेडणेकर, बाळासाहेब सुतार,  आप्पासाहेब बस्ताडे, दिनकर खवरे, सुरेश कांबळे, भिमराव सुतार व चन्नेकुपी गावातील सर्व सेवा संस्थेचे पदाधिकारी व पंचक्रोशीतील कार्यकर्ते, कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते. आभार आनंद पेडणेकर यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.