Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हलकर्णी येथे राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात



गडहिंग्लज (प्रतिनिधी): हलकर्णी येथे विविध शाळा, महाविद्यालय  व कार्यालयांमध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. 


डॉ. गंगाधर व्हसकोटी जनसंपर्क कार्यालय


समाजरत्न  डॉ. गंगाधर व्हसकोटी यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली. प्रतिमापूजन पूजन डॉ. गंगाधर व्हसकोटी यांनी केले. यावेळी उपसरपंच सलीम यमकमर्डी, माजी सरपंच उमेश इंगळे, के.के.पाटील, भागोजी गवळी, युवा उद्योजक सुमित संगाज, आप्पासाहेब टोणपी, इब्राहिम मकानदार, उत्तम जाधव, इराप्पा  व्हसकोटी, बसवराज पाटील, हसन मुलाणी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 



विद्या मंदिर गांधीनगर 


विद्या मंदिर गांधीनगर येथे राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापिका वैशाली जोशीलकर यांनी केले. यावेळी शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. विद्यार्थ्यांना शाहू महाराज यांच्या जीवनाविषयी माहिती उज्वला पोवार यांनी दिली. यावेळी शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.




हलकर्णी भाग हायस्कूल


हलकर्णी भाग हायस्कूलमध्ये राजर्षी शाहू जयंती आणि अमली पदार्थ विरोध दिन साजरा करण्यात आला. प्राचार्य आर. एस. पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. 




यावेळी  सोनिया सगाज, अक्षरा भुईम्बर, सौंदर्या पाटील, आदर्श हिरेमठ,  पूजा कोळी, राणी प्रिया पवार पिरापगोळ यांची भाषणे झाली. यानिमित्त शाळेत पोस्टर्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. कार्तिका पाटील, रोशनी देसाई, सृष्टी पाटील, वैष्णवी बोनी यांनी स्पर्धेत यश मिळविले.




वैष्णवी बोणी, प्रियांका कोरे यांनी अमली पदार्थांविषयी माहिती दिली. उपस्थित सर्वांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली. संकल्पचे वाचन प्रियांका कोरे यांनी केले. प्राचार्य आर.एस.पाटील यांनी शाहू महाराजांच्या कार्याविषयी माहिती दिली. दिपाली बंदी यानी सूत्रसंचालन केले.





Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.