गडहिंग्लज (प्रतिनिधी): तालुक्यातील विद्यामंदिर खणदाळ शाळेत नवागतांचे स्वागत, पुस्तक वाटप असा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी इयत्ता १ लीच्या मुलांची वाजत - गाजत मिरवणूक काढण्यात आली . मुलांचे औक्षण करून त्यांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. इंग्रजी माध्यम व इतर शाळेतून प्रवेश घेतलेल्या मुलांचेही स्वागत करण्यात आले . शाळेचे नूतन मुख्याध्यापक श्रीकांत पोवार यांचे स्वागत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष यरकदावर यांनी केले. यावेळी उपस्थित सर्व मुलांना पाठयपुस्तकांचे वाटप करण्यात आले. विज्ञान शिक्षक मल्लिकार्जुन यादगुडी यांनी १ लीच्या सर्व मुलांना बालमित्र अंकलिपी भेट म्हणून दिली. या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन विद्या मंदिर खणदाळच्या सर्व शिक्षकवृंद यांनी केले. या कार्यक्रमाला बी.आर.सी. चे विषयतज्ञ जमादार, केंद्र प्रमुख राजू कोरवी उपस्थित होते. आजच्या आहारासोबत गोड शिरा देण्यात आला. मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल श्रीकांत पोवार यांनी मुलांना गोड खाऊ वाटप केले.
स्वागत व प्रास्ताविक सौ. मगदूम यांनी तर आभार मारूती कोलूनकर यांनी मानले. अमित चव्हाण यांनी सूत्रसंचलन केले. श्रीमती पार्वती फडतरे, सौ. सुधा हुली, श्रीमती पाटील, लक्ष्मण कागिणकर उपस्थित होते.


