Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

'पीएम-किसान'च्या 17व्या हप्त्याचे मंगळवारी होणार वितरण

केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांची पत्रकार परिषदेत माहिती




पंतप्रधान 30,000 पेक्षा जास्त बचत गटांना ‘कृषी सखी’ प्रमाणपत्रांचे देखील वितरण करणार


 


नवी दिल्ली : केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण आणि ग्राम विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम-किसान (PM-KISAN) योजनेअंतर्गत सुमारे 20,000 कोटी रुपयांचा 17 वा हप्ता जारी करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 जून  रोजी वाराणसीला भेट देणार आहेत. यावेळी ते शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता वितरीत करतील आणि 30,000 पेक्षा जास्त बचत गटांना कृषी सखी म्हणून प्रमाणपत्रे प्रदान करतील. उत्तर प्रदेश सरकारच्या सहयोगाने केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय, हा कार्यक्रम आयोजित करणार आहे. उत्तर प्रदेशचे राज्यपाल, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आणि उत्तर प्रदेश सरकारच्या मंत्र्यांसह इतर मान्यवर यावेळी उपस्थित राहतील.




चौहान म्हणाले की तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या पहिल्या कार्यक्रमात, पंतप्रधान वाराणसी येथून केवळ एक बटण क्लिक करून पीएम किसान योजने अंतर्गत 9.26 कोटी पेक्षा जास्त लाभार्थी शेतकऱ्यांना 20,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा बहुप्रतीक्षित 17 वा हप्ता वितरित करतील.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.