योग प्रशिक्षक सौ. जयश्री पाटील यांनी केले मार्गदर्शन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): नेसरी येथील एस. एस. हायस्कूल व छत्रपती शिवाजी ज्युनिअर कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न झाला. योग कल्चर असोसिएशनच्या सचिव व योगा प्रशिक्षक सौ. जयश्री पाटील यांनी योगाचे मानवी जीवनातील महत्त्व याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर सौ. जयश्री पाटील यांनी विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिके करून घेतली. विद्यार्थी व विद्यार्थिनीनी मोठ्या आनंदाने व उत्साहाने ही प्रात्यक्षिके केली.
यावेळी सौ. पाटील यांचा सत्कार शाळेच्या वतीने करण्यात आला. याप्रसंगी शिक्षण समितीच्या सचिव डॉ. सौ. अर्चनाताई कोलेकर यांच्यासह सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.







