गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज महाविद्यालय व विवेकानंद योग केंद्र गडहिंग्लज यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक योग दिन’ संपन्न झाला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस.एम.कदम होते तर या कार्यक्रमास शिवराज विद्या संकुलाचे शिवराज सचिव डॉ.अनिलराव कुराडे, उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे, दिग्दर्शक अमोल देसाई यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रारंभी स्वागत एन.एस.एस.कार्यक्रम अधिकारी डॉ.जी.जी.गायकवाड यांनी केले तर प्रास्ताविक डॉ. डी. पी. खेडकर यांनी केले.
या कार्यक्रमात विवेकानंद योग केंद्राचे प्रमुख योगगुरू राम पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये निरोगी व निरामय जीवन जगण्यासाठी योगाशिवाय पर्याय नाही. आपले शरीर व मन सदृढ राहण्यासाठी सर्वांनी नियमित योगासन करणे गरजेचे आहे. योगाच्या माध्यमातून प्राचीन काळापासून आपल्या देशातील ऋषीमुनींनी चांगला माणूस घडविण्याची किमया करून दाखविली आहे. योगामुळे शरीराला सर्वांगीण गती प्राप्त होत असते. शिवाय आपण नेहमी प्रफुल्लीत व ताजेतवाने राहू शकतो. आपण योगासन मनपूर्वक करणे केल्याने आपल्यातील उर्जाशक्ती सतत कार्यरत राहते. योगामुळे मनावरील ताण निवारण होत असल्याचे सांगितले. यावेळी विवेकानंद योग केंद्राच्या कार्यवाह योगशिक्षिका सौ.सुरेखा कळसगोंडा व योग साधक- साधिका यांच्या समवेत योगाची प्रात्यक्षिके सादर केली.
प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये आज जागतिक योग दिन सर्वत्र साजरा होत आहे. आपल्या देशाने संपूर्ण जगाला योगाचे महत्व पटवून दिले आहे. त्याच बरोबर योगाची अनमोल अशी देणगी दिली आहे. योगाचे महत्व पटवून देण्यासाठी १७७ देशांनी जागतिक योग दिन साजरा करण्याबाबत प्रामुख्याने मांडण्यात आले. तेंव्हापासून २१ जून हा जागतिक योग दिन म्हणून जगभर साजरा होत आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये कौशल्यावर आधारीत अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना योगासन अभ्यास महत्वाचा आहे. त्यादृष्टीने विद्यार्थ्यांनी प्रयत्नशील राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी सागितले. यावेळी क्रीडा विभाग प्रमुख डॉ.राहुल मगदूम, ज्युनिअरचे पर्यवेक्षक प्रा.तानाजी चौगुले, डॉ.एस.डी.सावंत, प्रा.डी.यु.जाधव, क्रीडा शिक्षक प्रा.जयवंत पाटील आदींसह प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन क्रीडा, एन.सी.सी. व एन.एस.एस.विभागाच्यावतीने करण्यात आले.


