गडहिंग्लज (प्रतिनिधी): तनवडी (ता गडहिंग्लज) येथे किसान दुध संस्था शिंदेवाडी यांच्या सहकार्याने सुरु केलेल्या मातोश्री डेअरी फार्मला गोकुळ दुध संघाचे चेअरमन अरुणराव डोंगळे यांनी भेट देऊन गोठ्याची पाहणी केली.
स्वागत दीपक घुगरे यांनी केले. यावेळी चेअरमन अरुण डोंगळे व संचालिका अंजनाताई रेडेकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. चेअरमन श्री. डोंगळे म्हणाले, गोकुळ दुध संघाने दुध वाढीसाठी हरियाणाहुन म्हैशी खरेदी केली तर ४० टक्के अनुदान दिले जाईल या उद्देशाने विलास घुगरे, जंयवत घुगरे, दिपक घुगरे यांनी हरियाणाहुन २० म्हैशी, १ रेडा, ४ गायी खरेदी करून संघाला दुध पुरवठा करत आहेत ही बाब कौतुकास्पद आहे.
यावेळी संकलन अधिकारी ए. डी. मदकरी, डॉ. सुधाकर पाटील, सुपरवायझर सुरेश मगदूम, ज्ञानदेव पाटील, प्रकाश कदम, दीपक घुगरे, विलास घुगरे, जयवंत घुगरे, किसान दुध संस्थेचे सर्व संचालक उपस्थित होते. आभार प्रकाश कदम यांनी मानले.




