Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हसुरचंपू शिवसेना शाखा कार्यालय येथे शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा

बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांसाठी आयोजित आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): हसुरचंपू शिवसेना शाखा कार्यालय येथे शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. दरम्यान, शिवसेनेच्या वतीने बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी आयोजित आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.




प्रारंभी ज्येष्ठ शिव सैनिकांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.




यावेळी चंद्रशेखर खवणे, विजय पवार साहेब, भैरु बिरंजे, राजू फुटाणे, महादेव मस्ती, बिरप्पा हूकेरी, सुभाष हिबुले, बसू मटूरे उपस्थित होते. शाखाप्रमुख राजू गोटूरे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सर्व शिवसैनिकांना वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.



दरम्यान, बांधकाम कामगार यांच्यासाठी शिवसेनेच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर दिनांक १६ ते १९ या करावयात पार पडले. याचा लाभ गावातील 250 बांधकाम कामगार कुटुंबांनी घेतला आहे.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.