Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मनवाडच्या सरपंचपदी पांडुरंग लोखंडे यांची बिनविरोध निवड



गडहिंग्लज (प्रतिनिधी): मनवाड (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पांडुरंग लोखंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवड मंडल अधिकारी एस. व्ही. कामत यांच्या अध्यक्षखाली पार पडली.



मनवाड ग्रामपंचायतीची एकूण सदस्य संख्या सात आहे. सरपंच निवडीसाठी बोलावण्यात आलेल्या विशेष सभेस सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी मंडल अधिकारी श्री. कामत यांनी सदर सरपंच पद हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित असल्याचे सर्व सदस्यांना सांगितले. सरपंच पदासाठी पांडुरंग लोखंडे यांचे एकमेव  नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले. यासाठी ज्ञानप्रकाश रेडेकर यांनी सूचक म्हणून स्वाक्षरी केली. छाननी नंतर नामनिर्देशन पत्र वैध ठरले. सर्व सदस्यांच्या एकमताने ही निवड बिनविरोध करण्यात आली. निवडीनंतर मंडळ अधिकारी एस व्ही कामत यांनी नूतन सरपंच पांडुरंग लोखंडे यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या.



यावेळी उपसरपंच सौ. गीता रेडेकर, सदस्या वैभवी लोखंडे, नवलाप्पा कलगोंडा, शालिनी नावलगी, ज्ञानप्रकाश रेडेकर, कमल कांबळे यांच्यासह ग्रामसेवक व्ही. ए. जाधव, तलाठी व्ही. एन. शिवणगेकर, पोलीस पाटील जे. बी. कोरे, कोतवाल एस. जी. तुपुरवाडी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.