सभासद कल्याण निधीतून दीड लाख रुपयांचा धनादेश कुटुंबांकडे केला सुपूर्द
गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील पी. सी. पाटील गुरुजी प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे सभासद कै. गणपती लक्ष्मण दिवेकर यांचे निधन झाले. त्यांचे वारस श्रीमती सुलोचना गणपती दिवेकर यांना सभासद कल्याण निधीतून दीड लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. श्रीमती सुलोचना दिवेकर यांनी याबद्दल पतसंस्थेचे आभार व्यक्त केले.
शिक्षक नेते मधुकर येसने, सभापती राजकुमार शिंगटे यांनी कै. लक्ष्मण दिवेकर यांच्या आठवणींना उजाळा देऊन संस्थेच्यावतीने कुटुंबाचे सांत्वन केले. यावेळी उपसभापती आनंदा आजगेकर, संचालक उत्तम यमगेकर, पांडुरंग भोईटे, तज्ञ संचालक कल्लापा आमिनभावी, संचालिका मालुताई जाधव, पुष्पा दरेकर, सभासद शण्मुख गुडशी व कर्मचारी उपस्थित होते. संस्थेचे उपसभापती आनंदा आजगेकर यांनी स्वागत तर सचिव सुधीर उर्फ आप्पा शिवणे यांनी आभार मानले.

