Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

एक हात मदतीचा...कुटुंबाला आधार देण्याचा !

गडहिंग्लज प्राथमिक शिक्षक बँकेकडून मयत कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना कर्मचारी कल्याण निधीतून दोन लाख रुपयांचा धनादेश






गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील दि प्राथमिक शिक्षक बँकेचे कर्मचारी रावसाहेब गावडे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांना कर्मचारी कल्याण निधीतून दोन लाख रुपयाचा धनादेश शिक्षक बँकेकडून सुपूर्द करण्यात आला. धनादेश त्यांच्या पत्नी व मुलीने स्वीकारून शिक्षक बँकेचे आभार मानले.





यावेळी शिक्षक नेते मधुकर येसने, डी. एस. खामकर,  शिक्षक बँकेचे संचालक नंदकुमार वाईंगडे,  शिवाजीराव बोलके यांनी रावसाहेब गावडे यांच्या आठवणीना उजाळा देऊन कुटुंबाचे सांत्वन केले. तज्ञ संचालक सतीश तेली, शिक्षक संघ राज्य सल्लागार विठ्ठल कदम,  शिक्षक संघाचे अध्यक्ष अनिल बागडी, मार्गदर्शक मारुती कलकुटगी, शाखा अधिकारी रणजीत साळुंखे उपस्थित होते. आभार सरचिटणीस आयाज बागवान यांनी मानले तर सूत्रसंचालन आर. एन. पाटील यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.