Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हलकर्णीतील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

सामाजिक कार्यकर्ते डॉ. गंगाधर व्हसकोटी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): हलकर्णी येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. गंगाधर व्हसकोटी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.



शिबिराचे उदघाटन जि. प. माजी सदस्या रेखाताई हत्तरकी यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरात ५६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिरासाठी वैभवलक्ष्मी ब्लड सेंटर कोल्हापूर यांचे सौजन्य लाभले. या शिबिरातील रक्तदात्यांचा डोनर कार्ड, प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. डॉ. सचिन नाईक, अविनाश कांबळे, प्रियंका हिंदूळकर, प्रतीक्षा गुरव, शिवानी दरेकर यांनी रक्तदान शिबिराचे काम पाहिले.




यावेळी डॉ. गंगाधर व्हसकोटी, काशिनाथ रवेदार, उमेश इंगळे, उत्तम शेखर पाटील, जाधव, माणिक उपाध्ये, असगरअली बागवान, मारुती पाटील, विठ्ठल पाटील, भागोजी कागीनकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.