Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हसूरचंपू शिवसेना शाखा कार्यालयाकडून बांधकाम कामगारांना कार्ड नूतनीकरण शिबीर

रक्त तपासणी शिबिरालाही उत्स्फूर्त प्रतिसाद  





गडहिंग्लज (प्रतिनिधी): छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त हसूरचंपू शिवसेना शाखा कार्यालयाकडून बांधकाम कामगारांना कार्ड नूतनीकरण शिबीर राबविण्यात आले. याचा लाभ बांधकाम कामगारांनी  घेतला.




या शिबिरात जवळपास 50 बांधकाम कामगारनी उपस्थित राहत आपल्या कार्डाचे नूतनीकरण करून घेतले. दरम्यान, बांधकाम कामगारांसाठी रक्त तपासणी शिबिर देखील पार पडले. या शिबिराला देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शाखाप्रमुख मारुती कमते, चंद्रशेखर खवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.