गडहिंग्लज (प्रतिनिधी) : येथे ग्राहक पंचायतच्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांची 150 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी शाहू महाराज यांनी उभारलेले व सामाजिक एकोपा जपण्यासाठी केलेल्या समाज सुधारणा आणि विविध जातीमधील दुरावा दूर करण्यासाठी केलेले प्रयत्न याबद्दलची माहिती प्रा. सुरेश वडराळे यांनी उपस्थितांना दिली.
या वेळी गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुका विभागीय अध्यक्ष कॉम्रेड शिवाजी गुरव, तालुका अध्यक्ष ईश्वर देसाई, उपाध्यक्ष तानाजी कुराडे, डॉ महादेव ढोकरे-पाटील, महादेव शिंगे, सचिन लोहार, श्रीमती रोहिणी चौगुले उपस्थित होते आभार तानाजी कुराडे यांनी मानले.



