Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शेतकऱ्यांना विनामूल्य सोयाबीन बियाणे उपलब्ध करून द्या!

गडहिंग्लजला ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने कृषी अधिकाऱ्यांना निवेदन 


कृषी केंद्रांवरील शुल्क आकारणी देखील बंद करण्याची मागणी 





गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागाने विनामूल्य सोयाबीन बियाणे उपलब्ध करून द्यावेत तसेच कृषी केंद्रांवर केली जाणारी साठ रुपये शुल्क आकारणी देखील बंद करावी अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तालुका कृषी अधिकारी अनिल फोंडे यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे. सदर निवेदन जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.  



सध्या चांगला पाऊस झाल्यामुळे खरिप हंगामाच्या पूर्व मशागतीची लगबग सुरू आहे. गडहिंग्लज तालुक्यामध्ये सोयाबीन उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र सध्या सोयाबीन बियाणाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी सेवा केंद्रावर जादा दराने बियाणे खरेदी करणे खिशाला परवडणारे नाही. कृषी विभागाकडून दरवर्षी सोयाबीन बियाणे विनामूल्य दिले जाते. या पार्श्वभूमीवर यावर्षी देखील सोयाबीन बियाणे लवकरात लवकर उपलब्ध करून देवून ते शेतकऱ्यांना वेळेत वाटप करावे. तसेच कृषी केंद्रावर  ६० रुपये आकारणी चालू आहे ते देखील बंद करून मोफत बियाणे उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी या निवेदनातून शिवसेनेने केली आहे.



निवेदनावर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, चंदगड विधानसभा क्षेत्रप्रमुख राजू रेडेकर, तालुकाप्रमुख दिलीप माने, अजित खोत, युवा सेना जिल्हाधिकारी अवधूत पाटील, आजरा तालुका प्रमुख युवराज पोवार, तालुकाप्रमुख सुधाकर जगताप, सुरेश हेब्बाळे, संजय पाटील, महिला तालुकाप्रमुख स्नेहल पाटील, उपशहर प्रमुख काशिनाथ गडकरी आदींच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.