Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लजला शनिवारपासून हत्ती, कोले, षण्मुगम चषक शालेय फुटबॉल स्पर्धा

यंदाचे  स्पर्धेचे  तेरावे वर्ष; नाईन साईड स्पर्धा





गडहिंग्लज (प्रतिनिधी) : येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे शनिवारपासून (ता.13) रुद्राप्पा हत्ती, आप्पासाहेब कोले, शण्मुगम स्मृतीचषक शालेय फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. चौदा आणि सोळा वर्षाखालील गटाच्या या स्पर्धेचे यंदाचे तेरावे वर्ष आहे. एम. आर. हायस्कुल मैदानावर नाईन साईट पध्दतीने ही स्पर्धा होईल.



अजित क्रीडा मंडळाचे अध्यक्ष रूद्राप्पा हत्ती आणि सहकाऱ्यांनी दिवाळी सुट्टीत दोन दशके आंतरराज्य स्पर्धांची परंपरा रुजवली. एम. आर. हायस्कुलचे माजी क्रीडा शिक्षक, शिक्षणाधिकारी आप्पासाहेब कोले यांनी अनेक फुटबॉल खेळाडू तयार करून गडहिंग्लजचा नावलौकीक वाढविला. पुण्याचे पंच शण्मुगम यांनी अजित क्रीडा मंडळाच्या स्पर्धा यशस्वी करणेसाठी तांत्रिक बाजू सांभाळून योगदान दिले. या सर्वांच्या योगदानाची नव्या पिढीला ओळख व्हावी या उद्देशाने गेली बारा वर्षे ही स्पर्धा घेतली जाते. शासकीय स्पर्धेची तयारी व्हावी म्हणून हंगामाच्या सुरवातीला हि स्पर्धा घेतली जाते. स्थानिकांसह ग्रामीण भागातील गिजवणे, भडगाव, गारगोटी या संघाना निंमत्रित करण्यात आले आहे. 



विजेत्या, उपविजेत्या संघासह उत्कष्ठ गोलरक्षक, बचावपटू, मध्यरक्षक, आघाडीपटू यांना वैयक्तीक बक्षिसे आहेत. स्पर्धेतून चौदा वर्षांखालील उदयोन्मुख खेळाडू निवडून डेव्हलपमेंट संघ तयार केला जाणार आहे. तरी शालेय संघानी सहभागी व्हावे असे आवाहन गडहिंग्लज युनायटेडचे अध्यक्ष मलिकार्जून बेल्लद, उपाध्यक्ष डॉ रविंद्र हत्तरकी  यांनी केले आहे. स्पर्धा प्रमुख प्रथमेश धबाले, समन्वयक शुभम आजगेकर, सौरभ मोहिते आणि सहकारी स्पर्धेचे नियोजन करीत आहेत. शुक्रवारी सायंकाळी स्पर्धेचे ड्रॉ केले जाणार आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.