Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हलकर्णी भाग ज्युनिअर कॉलेजच्या व्यवसाय शिक्षण विभागात नवागतांचे स्वागत



गडहिंग्लज (प्रतिनिधी): हलकर्णी भाग ज्युनिअर कॉलेजच्या व्यवसाय शिक्षण विभागात ११ वीच्या नवागत विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य आर. एस. पाटील होते. यावेळी डॉ. घाळी महाविद्यालयाच्या डॉ. सीमा साखरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.



प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी कु.कविता जारकोळी, राधिका चौगुले, सानिका जांबोणी, मयुरी शेरवी, नम्रता शिरहट्टी, रोहन कदम यांनी मनोगते व्यक्त केली.



डॉ. सीमा साखरे यांनी 'किशोरवयीन मुलांचा काळ व त्यांचा विहार, आरोग्य कसे जपावे' याबद्दल मार्गदर्शन केले. आजच्या आधुनिक युगात युवक व युवतीनी सजग राहून आपली जीवनशैली काळानुरूप बदलून प्रगती केली पाहिजे, मोबाईलचा किमान वापर, दिवसभरातील कार्याचे नियोजन, स्वतःसाठी वेळ देवून आत्मसंवाद आदी विषयावर मार्गदर्शन केले. प्राचार्य आर.एस. पाटील यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी श्रीमती नरेवाडीकर यांचा देखील सत्कार समारंभ पार पडला.

  


यावेळी प्राचार्य आर. एस. पाटील यांचा सत्कार  व्ही. आर. पाटील यांनी तर डॉ. सीमा साखरे यांचा सत्कार सौ. संगीता पोतदार यांनी केले. स्वागत, प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय पी. बी. इंगळे यांनी केले. सूत्रसंचलन सौ. मनीषा गवाणे यांनी तर आभार आर. डी. सासने यांनी मानले.




कार्यक्रमास प्राचार्य राजीव पाटील, राजाभाऊ सासणे, प्रकाश इंगळे  चंद्रकांत भोसले, ईराप्पा कांबळे, अविनाश कुराडे, रामदास रणदिवे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.