Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

संकेश्वर रोड व आजरा रोडवरील पथदिव्यांची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची!

महामार्ग प्राधिकरणाने तात्काळ वीजबिले भरून नागरिकांची गैरसोय टाळावी 


गडहिंग्लज नगरपालिकेकडून प्राधिकरणाला विनंती पत्र 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): शहरातील संकेश्वर रोड शेरी ओढा ते आजरा रोड गिजवणे ओढा पर्यंतचा रस्ता, गटर व पथदिवे नगरपरिषदकडून राष्ट्रीय महामार्गसाठी हस्तांतरित केले आहे. त्यामुळे नगरपरिषदेची त्यावर आता कोणत्याही प्रकारची मालकी नाही. येथे बसविण्यात आलेल्या दिवे हे जास्त क्षमतेचे असल्याने त्याचा खर्च हा नगरपरिषदेला आर्थिकदृष्ट्या झेपणारा नाही त्यामुळे वीजबील महामार्ग प्राधिकरणानेच भरावे व नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी असे पत्राद्वारे त्यांना कळविण्यात आले आहे, मात्र महामार्ग प्राधिकरणाकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नसल्याची माहिती मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.




संकेश्वर - बांदा राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८ वरील गडहिंग्लज शहरातील नगरपरिषद हद्दीतील नगरपरिषद मालकीच्या संकेश्वर रोड शेरी ओढा ते आजरा रोड गिजवणे ओढा पर्यंतचा रस्ता, गटर व पथदिवे नगरपरिषद कडून राष्ट्रीय महामार्गसाठी हस्तांतरित केली आहे. रस्ता हस्तांतरित केला असल्याने नगरपरिषदेची त्यावर आत्ता कोणत्याही प्रकारची मालकी नाही. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ नुसार नगरपरिषदच्या मालकी नसलेल्या मालमत्तेवर नगरपरिषदेला कोणताही खर्च करता येत नाही खर्च केल्यास स्थानिक निधी लेखापरीक्षण विभागाकडून नगरपरिषद लेखापरीक्षण मध्ये आक्षेप घेऊन त्याची वसुली लावली जाते.


तसेच राष्ट्रीय महामार्गवरील सध्यस्थितीत बसविण्यात आलेले दिवे हे जास्त क्षमतेचे असल्याने त्यावरील होणरा वीज देयेकाचा खर्च हा नगरपरिषदेला आर्थिकदृष्ट्या झेपणारा नाही. ज्याअर्थी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८ वरील टोल मार्फत वसुली करण्यास बंधनकारक आहे त्याअर्थी राष्ट्रीय महामार्गवरील पथदिवे यांची वीज देयके महामार्ग प्राधिकरणाने भरणे क्रमप्राप्त आहे.




भविष्यातील राष्ट्रीय महामार्ग रस्तावरील पथदिव्यांचे वीज देयके व रस्ता, गटर व पथदिव्यांची देखभाल व दुरुस्ती करणे हे देखील महामार्ग प्राधिकरणा वर बंधनकारक राहील. तसेच राष्ट्रीय महामार्गवरील पथदिवे बंद असल्याने नागरीकांच्या तक्रारी प्राप्त होत असुन सदर पथदिवे तात्काळ चालु करण्यासाठी नागरिकांकडून विचारणा करण्यात येत आहे. यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांना आपल्या स्तरावरून पथदिव्याचे वीज बील देयके भरण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी, तसेच गडहिंग्लज शहरातील नागरिकांचे गैरसोय झाल्यास आपण जबाबदार राहणार असे विनंती पत्र सुद्धा नगरपरिषदे कडून देण्यात आले आहे. यावर राष्ट्रीय महामार्ग यांचेकडून अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही, अशी माहिती  मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.