जोरदार पावसामुळे हिरण्यकेशी नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ
पुलावरील वाहतूक मात्र सुरळीत सुरू
भडगाव आपत्ती व्यवस्थापन टीम परिस्थितीवर लक्ष ठेवून
छायाचित्र : वसंत नाईक, भडगाव
गडहिंग्लज (प्रतिनिधी): जोरदार पावसामुळे हिरण्यकेशी नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ झाली आहे. आज सायंकाळी सात वाजल्यापासून भडगाव पुलावर पाणी पुलाच्या कठड्याला समांतर आहे. पुलावरील पाणी निचरा होण्यासाठी बसवण्यात आलेल्या पाईप मधून पाणी येताना दिसत आहे. मात्र भडगाव पुलावरून गडहिंग्लज-चंदगड राज्य मार्गावरील वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे.
पावसाचा जोर कायम राहिल्यास पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊ शकते. यामुळे रात्री उशीरा पुलावर दुसऱ्यांदा पाणी येण्याची शक्यता आहे. हिरण्यकेशी नदीच्या पाणी पातळीवर भडगावच्या तलाठी सौ. रूपाली कांबळे, पोलीस पाटील उदय पुजारी, भडगाव नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन समिती सदस्य वसंत नाईक लक्ष ठेवून आहेत.




