Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हलकर्णीतील सुदृढ बैलजोडी स्पर्धेत तेरणीच्या मुबारक जमादार यांची बैलजोडी प्रथम


हनुमान दूध संस्थेचे चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य विजय शेरवी यांच्यावतीने स्पर्धेचे आयोजन 



हलकर्णी : सुदृढ बैलजोडी स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक वितरण करताना विजय शेरवी व इतर मान्यवर. 



गडहिंग्लज (प्रतिनिधी): हलकर्णी येथे देशी बेंदूर सणानिमित्त हनुमान दूध संस्थेचे चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य विजय शेरवी यांच्यावतीने घेण्यात आलेल्या सुदृढ बैलजोडी स्पर्धेतील बिन दाती गटात महेश आप्पासाहेब रेडेकर (महागाव), दाती गटात बाबासाहेब घुगरे (महागाव) यांच्या बैल जोडीने प्रथम क्रमांक पटकावला. बैल जोडी गटात मुबारक जमादार (तेरणी ) प्रथम, द्वितीय क्रमांक ए वाय पाटील (म्हाकवे)कागल, तृतीय क्रमांक राजेंद्र शिवाजी फडके (येणेचवंडी). दाती गटात प्रथम क्रमांक बाबासाहेब घुगरे (महागाव), द्वितीय क्रमांक विठ्ठल धोंडाप्पा पाटील (हलकर्णी), तृतीय क्रमांक सचिन पाटील (कडाल). बिनदाती गटात प्रथम क्रमांक  महेश आप्पासाहेब रेडेकर (महागाव), द्वितीय क्रमांक भीमराव बाळकू शिंत्रे (येणेंचवडी), तृतीय क्रमांक रामगोंडा रामाजगोळ (हलकर्णी) यांनी पटकावला. 




ही स्पर्धा हनुमान दूध संस्थेच्या प्रांगणात घेण्यात आली. यावेळी सर्व स्पर्धकांना मानाचा फेटा व दहा किलो कुळती पोती देऊन गौरवण्यात आले. यावेळी हनुमान दूध संस्थेचे चेअरमन विजय शेरवी, व्हाईस चेअरमन अपय्या  हिरेमठ, डॉ मारुती व्यापारी, भीमा शिखरी, आडव्याप्पा पाछापुरे, शब्बीर पानारी, राजेंद्र मुनोळी, तानाजी पाटोळे, महादेव पाटील, शिवपुत्र पाटील, निलेश चिटणीस, तिप्पांन शेरवी, रमेश बोळगेवी, हनुमान दूध संस्थेचे सर्व पदाधिकारी, पंच कमिटी, ग्रामस्थ व पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



      

प्रास्ताविक व सूत्रसंचालन गजानन सुरनाईक, चंद्रकांत गुरुवानगोळ तर आभार अमानुल्ला मालदार यांनी मानले.










Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.