Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हलकर्णीत बांधकाम कामगार भांडी साहित्य नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

७५१ बांधकाम कामगारांनी केली नोंदणी





गडहिंग्लज (प्रतिनिधी): हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथे असंघटित बांधकाम कामगारांना संसारोपयोगी भांडी साहित्य नोंदणीसाठी आयोजित शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.




जिल्हा परिषदेचे माजी सदस्य  जयकुमार मुन्नोळी यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन करण्यात आले. शिबिराचा सुमारे ७५१ बांधकाम कामगारांनी लाभ घेतला. रामलिंग कार्यालयात शिबिराचे नेटके नियोजन करण्यात आले.



यावेळी युवा उद्योजक शिवकुमार संसुद्धी, प्रसाद जोशी, नारायण पाटील, नागाप्पा पाटील, गौतम सन्माने, अशोक पाटील, राजेंद्र मुन्नोळी, चंद्रकांत गुरुवानगोळ, आप्पा यमकनमर्डी, मारुती पाटील, किशोर राऊत, बसवराज पुजारी, सुशांत नौकुडकर, संकेत पाटील, रामा पाटील, बालकृष्ण भोसमोडे, मयुर दड्डीकर, बाळाप्पा रत्नापगोळ, सागर हिरेमठ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.





व्हिडीओ येथे पहा 👇👇




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.