छायाचित्र : वसंत नाईक, भडगाव
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : हिरण्यकेशी नदीवरील भडगाव पुलावर काल आलेले पुराचे पाणी संथ गतीने ओसरू लागले आहे. आतापर्यंत जवळपास अर्धा फूट पाणी उतरले आहे. पश्चिम भागात पाऊस थांबल्यास पुलावरील पुराचे पाणी हळूहळू ओसरण्यास मदत होईल. पाऊस झाल्यास पुलावरील पाण्याची पातळी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. सध्या या मार्गावरील गडहिंग्लज- चंदगड राजमार्ग काल दुपारपासून ठप्प झाली आहे. वाहतुकीसाठी हा मार्ग बंद करण्यात आला आहे. नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पोलीस प्रशासन, महसूल, आपत्ती व्यवस्थापनची टीम पुराच्या पाण्यावर लक्ष ठेवून आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला बॅरिकेट्स लावून मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पोलिसांनी या ठिकाणी बंदोबस्त ठेवला आहे. वाहतुकीसाठी हा मार्ग महत्त्वाचा असल्याने सर्व नागरिकांना भडगाव पुलावरील पाणी ओसरण्याची प्रतीक्षा आहे.
भडगाव आपत्ती व्यवस्थापनची टीम रात्रंदिवस कार्यरत
![]() |
| भडगाव : पोलीस पाटील उदय पुजारी, पाणीपुरवठा कर्मचारी बाळासाहेब कांबळे, सामाजिक कार्यकर्ते वसंत नाईक. |
भडगावचे पोलीस पाटील उदय पुजारी, सामाजिक कार्यकर्ते वसंत नाईक, तलाठी सौ. रुपाली कांबळे हे पुराच्या पाण्यावर रात्रंदिवस लक्ष ठेवून आहेत. उदय पुजारी व वसंत नाईक हे आपत्ती व्यवस्थापन टीमचे दोन सदस्य तर ज्या ज्या वेळी भडगाव पुलावर पुराचे पाणी येते त्या त्यावेळी पूर्णवेळ या ठिकाणी थांबून राबत असतात. कोणाचीही गैरसोय होऊ नये व अडचण निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाशी संपर्क साधून त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असतात. या दोन्ही सदस्यांना नागरिक रात्रंदिवस भ्रमणध्वनीवर संपर्क साधत असतात. नागरिकांना न कंटाळता सौजन्याने हे दोन्हीही सदस्य पुलावरील वाहतुकीबाबत माहिती देत असतात. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टळते व प्रसंगी वेळ व पैसा वाचण्यास मदत होतो. दरम्यान, आज पहाटे पोलीस पाटील उदय पुजारी व सामाजिक कार्यकर्ते वसंत नाईक, ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा कर्मचारी बाळासाहेब कांबळे यांनी भडगाव पुलावरील पुराच्या पाण्याची पाहणी केली. पुलावरून संथ गतीने पाणी ओसरण्यास सुरू झाले असून जवळपास अर्धा फूट पाणी ओसरल्याचे सांगण्यात आले.
व्हिडिओ येथे पहा 👇👇




