उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विद्यार्थिनी घेतला आनंद
गडहिंग्लज (प्रतिनिधी): हलकर्णी भाग हायस्कूलमध्ये शिक्षण सप्ताह कार्यक्रमांतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम व पाककला स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या.
यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन प्रशालेचे मुख्याध्यापक आर. एस. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमासाठी इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी तर पाकाकला स्पर्धेत इयत्ता सहावी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत आनंद लुटला. पाककला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध पौष्टिक पदार्थ बनवून आणले होते. त्या पदार्थांची आकर्षक मांडणी करण्यात आली होती. स्पर्धेनंतर विविध प्रकारच्या पदार्थांचा विद्यार्थ्यांनी आस्वाद घेतला.
कार्यक्रमाचे नियोजन प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक आर. एस. मठपती आणि सौ. स्वाती पोतदार यांनी केले. कार्यक्रमासाठी पर्यवेक्षक के. बी. पाटील, एस. ए.पाटील, सुहास येणेचवंडी, सौ. शितल होडगे उपस्थित होते.




